कोरोना आजार हा जागतिक महामारी म्हणून WHO ने जाहीर केला आहे – अरुण कोल्हे आरोग्य समन्वयक !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
दिनांक 11/1/2022 रोजी प्रा आ केंद्र मेंदडी अंतर्गत श्री समर्थ कॉलेज मेंदडी कोंड आणि अंजुमन हाय स्कूल गोंडघर येथे कोविड प्रतिबंधत्मक लसीकरण (कोव्हक्सिन लस) 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना लस देण्यात आली या वेळी प्राचार्य श्री इमरान शेख, रईस शेख, इंग्रजी विभाग प्रमुख श्री मुजावर सर, फैयाज सर हे उपस्थित होते त्याकामी कोविड योद्धे , श्रीम. दिपिका वाणी आरोग्य सेविक ,श्री जयकृष्ण वेटकोली आरोग्य साहयक , श्री गोरेगावकर, श्रीम गीता भगत, श्री बंडू ढोले, श्रीम दीपिका दिवेकर, श्री.निवळकर यांचे सहकार्य लाभले.

सदरील संस्थेतील प्राचार्य श्री संदीप कांबळे , प्रा.वैभव नाक्ति, प्रा. किशोर शितकर, प्रा.अंगद कांबळे कर्मचारी यांचेही सहकार्य या वेळी लाभले. श्री.अरुण कोल्हे – आरोग्य सेवक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, एखादया देशाची प्रगती ही अर्थ व्यवस्थेवर उभारलेली आहे आणि ती जर सुधारायाची असेल तर उत्तम आरोग्य राखने गरजेचे आहे. जर आरोग्य उत्तम असेल कामाचा वेग वाढेल आणि प्रगती वाढेल.  कोरोना आजार हा जागतिक महामारी म्हणून WHO ने जाहीर केला आहे आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच उपाय आज समोर आहे. 100% लसीकरणचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मा.डॉ गायकवाड सर तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनात प्रा.आ. केंद्र मेंदडी येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या टीमने काळसुरी गाव 100 % कोविड प्रतिबंधत्मक लसीकरण पूर्ण केला आहे.

https://youtube.com/shorts/7RAtqjI2uHs?feature=share

त टीमला सौं.अरुणा नाक्ती ( सरपंच ), सर्व सदस्य, श्री मनोहर वारगे (पोलीस पाटील ), सामाजिक कार्यकर्ते, ग्रा प कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे योगदान लाभले सहकार्य लाभले. प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी अंतर्गत मेंदडी, वारळ, खरसई ही 3 उपकेंद्र, 10 ग्रामपंचायत आणि 16 गाव/ वड्या येतात त्यामध्ये तोंडसुरे, रेवली, तुरुंबाडी, रोहिणी हया ग्रामपंचायत चे कोविड प्रतिबंधत्मक लसीकरण 95% पेक्षा जास्त झालेले आहे तर वरवटणे, खरसई, मेंदडी, गोंडघर वारळ, हया ग्रामपंचायत अजून काही प्रमाणात लसीकरनात मागे आहेत. सरपंच यांच्या समन्व्ययाने आम्ही नक्कीच 100% लसीकरनाचे उद्दीष्ट साध्य करू त्यासाठी डॉ प्राजक्ता पोटे, डॉ चारुशीला गायकवाड,श्रीम विमल पोटफोडे, श्रीम दीपिका पाटील, श्री दीपेश अंदेकर, श्री योगेश पालेकर, श्री कृष्णा पाटील सर्व आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शासनाच्या नवीन सूचना नुसार 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थी कार्यक्षेत्रात येणाऱ्या 1 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,6 शाळा, महाविद्यालय यांचे कोविड प्रतिबंधत्मक लसीकरण पहिला डोस देऊन पूर्ण केले आहे त्यासाठी संस्थाप्रमुख, प्रिन्सिपल, मुख्यध्यापक शिक्षण विभाग आणि आमचे समन्व्यक श्री कोल्हे यांचे सहकार्य लाभले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या