ग्रामीण रुग्णालय च्या वतीने जागतिक क्षयरोग दिन साजरा !

(रायगड /म्हसळा ता.प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे)
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे, सुनील थळे, श्री विजय पाटील या प्रसंगी उपस्थित होते.

प्राचार्य प्रभाकर मोरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी समाजाला सक्रिय प्रतिसाद दिला पाहिजे.
श्री.विजय पाटील व सुनील थळे यांनी विद्यार्थाना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क चा वापर करणे तसेच क्षयरोग संबधी माहिती दिली.
तसेच  शासन जनतेसाठी ज्या काही वैद्यकीय योजना राबवित आहे. या योजना साकारण्यासाठी सर्वानी आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. 
या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या