देगांव येथे 38 व्या अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ ; संगीतमय शिवमहापूरान कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]

नायगाव तालुक्यातील मौजे देगांव येथे दरवर्षी प्रमाणे यावी वर्षी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. मा.शु.8 शके 1944 दिनांक 29 जानेवारी पासून सप्ताहास प्रारंभ होत आहे. पंचक्रोशीत नावाजलेल्या या गावचा सप्ताह मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा होत असतो. मोठं मोठे कीर्तनकार आपली सेवा बजावत असतात. देगांव येथील अखंड हरीनाम सप्त्याचे हे 38 वे वर्ष आहे. गेल्या 37 वर्षा पासून ही परंपरा अखंडीत अजूनही मोठ्या उत्सहात साजरी होते.

अखंड हरीनाम सप्त्याची कीर्तनसेवा 29 जानेवारी पासून चालू होणार आहे अनुक्रमे पुढील कीर्तन आयोजित केले आहेत. ह.भ.प.कृष्णप्रिया स्वरांजली दीदी (दि.29), ह. भ. प. उत्तरेश्वर महाराज बीड (दि.30), ह. भ. प. बाबू महाराज काकांडीकर (दि.31), ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापूरकर (दि.1), ह. भ. प. वैभवी श्रीजीं दीदी अमरावती (दि.2), ह. भ. प. राम महाराज ठाकूरबुआ (दि.3), ह. भ. प. वैभव महाराज राक्षे (दि.4), ह. भ. प. अक्षय महाराज भोसले (दि.5 ) यांचे कीर्तन आहे.
रविवार पासून चालू होत असलेल्या साप्ताहची सुरुवात गावांत ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली. यावेळी सकाळी प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी टाकण्यात आली होती. टाळकरी, मृदगाच्या जय घोष करत पूर्ण गावाला फेरी मारून सप्ताहची सुरुवात मोठ्या थाटा माटात केली. पुढील सात दिवस सप्ताहत शिवमहापुरान कथा व ज्ञानेश्वरी पारायण असणार आहे. शिवमहापूरान कथा बालयोगिनी साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली उदगीर यांच्या पवित्र वाणीने एकावयास मिळणार आहे.
या सप्ताहसाठी विश्वजीत महाराज खैरे (शिवमहापूरान कथा सिंधवादक), सुधीर महाराज पळसीकर (गायक ), धोंडिबा महाराज मोकासदरा (ज्ञानेश्वरी पारायण), बालाजी रुईकर (गाथाविना प्रमुख), सायलू गागलेगावकर (हरिपाठ प्रमुख), गंगाधर रुईकर (कीर्तनविना प्रमुख ), बाळू बेळकोणीकर, विठ्ठल बेळकोणीकर(मृदगाचार्य) व तसेच पंचक्रोशीतील टाळकरी मंडळीचीं उपस्थिती असणार आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या