आई वडिलांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा – माजी आ.वसंतराव चव्हाण !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आई वडिलांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा असल्याचे मत आ. वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ते वासवी माता जयंती निमित्त स्व. बायानाबई जवादवार यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

नायगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारोती राजेश्वर कत्तुरवार व प्रदीप जीवनराव देमेवार यांच्या पुढाकारातून आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी वासवी माता जन्मोत्सवा निमित्त स्व बायानाबई जवादवार यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ आर्य वेश्य समाजातील नोदंनीकृत जेष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. वसंतराव चव्हाण, सदानंद उध्दवराव मेडेवार (उद्योगपती), नांदेड, माजी .जि.प. सदस्य बालाजी गणेशराव बच्चेवार ज्येष्ठ नागरिक, गणेश सा. बचेवार, सौ. शाशिकलाबई गोविंदराव पांपटवार, भागवत सावकार प्रतापवार, संगमनाथ साव. कावटीकवार, पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, गजानन चौधरी, नागेश पाटील कल्याण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कन्याका परमेश्वरी वासावी माता कन्यका देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती मान्यवारांच्या यांच्या शुभ हास्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा शाल ट्रॉफी व माळ देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी आ. वसंतराव चव्हाण असे ही म्हणाले की, हा शहरातील जेष्ठ नागरिकांचा सत्काराचा पहिलाच कार्यक्रम असेल जो जवादवार कुटुंबियांच्या संकल्पना व पुढाकारातून आकारास आला आहे. यानिमित्ताने सर्वांनी आपल्या मात्याईत्याची सेवा इमानितबरे करावी ईश्वर आपणास काहीच कमी पडू देणार नाही असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास आर्य वैश्य समाजातील बहुसंख्य महिला, पुरुष व तरुणांची मोठी उपस्थिती होती.
श्रीनिवास व्यंकटी जवादवार, वसंत व्‍यंकटी जवादवार, सुधाकर व्यंकटी जवादवार व समस्त जवादवार परिवाराने सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यथा शक्ती परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर जवादवार यांनी केले तर सुरेख संचालन सहशिक्षक नलबलवार सर यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या