लाल बहादूर शास्त्री महाविदयालयाचा संतोष साखरे यांची यिन जिल्हाध्यक्षपदी निवड !

धर्माबाद  [ गोविंद बिरकुरे ]
 सकाळ माध्यम समुहाच्या यिन अर्थात ‘यंग इन्सिपरेटर्स नेटवर्क तर्फे घेण्यात आलेल्या निवडणुकीत धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविदयालयाचा विद्यार्थी संतोष साखरे यांची ‘यिन’च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.

जिल्हयातील 24 महाविदयालयांनी यात सहभाग घेतला होता. नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात रविवारी (ता.दोन) ही निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी 60 गुणांची लेखी व 40 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. यात आपल्या लेखन आणि भाषण कौशल्य परीक्षकांसमोर मांडत संतोष साखरे याने 100 पैकी 79 गुण मिळवून मतदान प्रक्रियेत आपले स्थान मिळविले. त्यानंतर उपस्थित सर्व महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे मतदान घेण्यात आले. यात संतोष साखरे यांनी प्रथम क्रमांकाचे मत घेऊन जिल्हाध्यक्ष निवड झाल्याचे कळताच समर्थकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. गजानन मोरे आणि यिन चे माजी मंत्री चक्रधर बनसोडे यांनी काम पाहिले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा अधिकारी पवन वडजे यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली. या निवडीबद्दल रसायनशास्त्र विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ पटवारी सर, प्रा.कामिनवार सर, डॉ कासराळीकर सर ,नक्कलवार सर कनिष्ठ विभागाचे बोधनकर सर, शेख सर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या