उत्तम आरोग्य हवे असेल तर ; योगा करण्याशिवाय पर्याय नाही. -प्रा.डी.पी.पांडेय

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शंकरनगर येथील श्री भास्करराव बापूराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल व ज्यु, कॉलेज शंकरनगरच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेच्या प्रांगणात सकाळी ठीक ६ वाजता योग दिन साजरा करण्यात आला .
प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले त्यामध्ये सूर्यनमस्कार, कपाल भारती, भुजंगासन , वक्रसन, आलोम मिलोम , धडे देऊन योगासनांची महत्व सांगताना शारीरिक ,भावनिक ,मानसिक संतुलन राखून जीवन परिपूर्णपणे कसे जगावे , शरीर आणि मन दोन्ही पातळीवर व्यक्तीला तंदुरुस्त बनवण्याचं काम योगा करत असल्यामुळे इतर व्यायामापेक्षा योगा हा शरीराला आतून आणि स्नायूंना बळकट करण्याचं काम करत असतो म्हणूनच एक तास तरी आपण आपल्या आरोग्यासाठी दिला पाहिजे जी व्यक्ती नियमित योगा करते ती व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा तंदुरुस्त असते रोगांचा सामना करण्याची क्षमता योगामुळे वाढते प्रसंगी विद्यार्थी ,पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उवस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या