शिवजयंती दिनी शिवाजी पवार “युवा उद्योजक” म्हणून सन्मानित !

(विशेष प्रतिनिधी-रियाज पठाण)

लोहा तालुक्यातील रिसनगांव येथील युवा उद्योजक म्हणून शिवाजी व्यंकटराव पवार,यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा-2021कार्यक्रमात यांना गौरविण्यात आले.

रयतेचे राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्ताने दि.१९फेब्रुवारी रोजी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा-2021कार्यक्रमात रिसनगाव येथील युवा उद्योजक, इंदिरा महिला बचतगट रिसनगांव, विविध शैक्षणिक, सामाजिक,कृषी,गैस एजन्सी,दुग्ध व्यवसाय, शालेय पोषण आहार,यांसह अनेक उद्योग भरभराटीस आणून अनेकांच्या हाताला काम देऊन समाजात एक प्रकारे नवा आदर्श निर्माण करणारे, त्याबरोबरच अनेक व्यवसायात कमी कालावधीत वाढत्या अनुभवानुसार जबाबदारी पेलून चालणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून,युवा उद्योजक म्हणून यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, शिवजन्मोत्सव समिती नांदेड चे अध्यक्ष तथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे नांदेड जिल्हाध्यक्ष तिरूपती पा.भगनुरे यांच्या स्वाक्षरीने सन्मान पत्र आयोजित नांदेड येथील भव्यदिव्य कार्यक्रमात संयोजक मंगेश पा.कदम, आयोजक तिरूपती पा.भगनूरे, माधव वडवळे,श्री पाटील खराणे,भगवत पा.ढेपे, विशाल पा.इंगळे, अनिल तेलंग, साईराज ढगे, शिवराज पा.ढगे, मारोतराव कवळे गुरूजी, माजी जि.प.सदस्य वच्छलाताई पुयड, डॉ.बालाजी पेनूरकर यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सदरिल कार्यक्रमात गौरविण्यात आले.

ताज्या बातम्या