युवाशक्तीला समाजसेवेचे धडे देण्याचा उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे – डॉ.एस बी मनुरकर !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्येश हा देशातील युवाशक्तीला समाजसेवेचे धडे देण्याचा आहे त्यामुळे या योजनेचे ब्रीद हे Not Me but you आहे. आज देशातील 420 विद्यापीठातील 38 लाख विद्यार्थी या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे या युवाशक्तीचा योग्य उपयोग करून घेणे हे कार्य कार्यक्रमाधिकारी यांचे आहे.

असे प्रतिपादन विभागीय समन्वयक प्रा.डॉ.एस.बी. मनुरकर यांनी येथील शरदचंद्र महाविद्यालय नायगाव बाजार च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास या विषयावर मौजे पिंपळगाव ता नायगाव ( खै)येथे उद्घाटनप्रसंगी केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर पाटील चव्हाण हे होते तर प्रमूख उपस्थिती प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांची होती. पुढे बोलताना डॉ.मनुरकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या चक्रावर लाल आणि निळ्या रंगाच्या पट्टया आहेत त्याचा अर्थ एनएसएसचा विद्यार्थी 24 तास सेवेसाठी तत्पर आहे तर निळा रंग विशाल मनाचा आहे. त्यामुळे स्वंयसेवकांनी या बाबी कायम स्मरणात ठेवाव्यात.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी शिबीराचे प्रास्ताविक करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना खूप महत्वाची आहे.
विद्यार्थी मनाने आणि तणाने यंग असतात त्याचा उपयोग इतरासाठी होणे अत्यंत गरजेचे आहे, समाजाचे मी कांहीतरी देणे आहे हा विचार ‘ स्विकारला पाहीजे म्हणून एनएसएसचे ब्रीद Not me but you असे आहे. यावेळी जेष्ठ प्राध्यापक डॉ. शंकर गड्डमवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थांनी आपला स्वार्थ सोडला की, But you चा विचार करतो त्यासाठी प्राथमिक पातळीपासूनच नैतिकतेचे धडे देणे महत्वाचे आहे. प्रशासनातील उच्च अधिकारी उदा. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिकारी अशा अनेक अधिकारी जेंव्हा प्रत्यक्ष पैसे घेताना जाळ्यात अडकतात याचाच अर्थ ते मोठे अधिकारी होऊनदेखील त्यांना But you चा अर्थ समजलेला नाही असाच त्याचा अर्थ होतो. जि.प. व मनपाच्या शाळा बंद होतील अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. भविष्यात जि.प. च्या शाळा बंद झाल्या तर खाजगी शाळातील फीस न परवडल्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होतील अशी भीती व्यक्त केली तेंव्हा हे कार्य But you साठी नसून केवळ For me साठी होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास पिंपळगावचे सरपंच प्रतिनिधी अहेमद शेख, उपसरपंच प्रतिनिधी रावसाहेब कदम, गुरुनाथ इंगोले, माधव देवकर, गंगाराम देवकर, विठ्ठल जोगदंड, दिलीप माने, महेश्वर कदम, मुख्याद्यापक संजय पचलींग, वीरभद्र मिरावाड शाळेतील सर्व शिक्षक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थिती होती कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. शाम पाटील, प्रा.डॉ. सिद्यीकी हे दोन्ही कार्यक्रमाधिकारी अतिशय चांगली व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश्वर हसनाळे यांनी केले तर आभार साईनाथ नामवाडे यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या