जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी पासून जवळ अंतरावर असलेल्या चिरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 22 एप्रिल रोजी शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता हारी तानाजी पाटील चव्हाण हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच बालासाहेब पाटील चव्हाण, माजी सरपंच अशोक दगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संजय पाटील ढगे, माधव वाघमारे ,लक्ष्मण मेहरे कर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. क्रांती शिलानंद कैवारे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष केदार पाटील ढगे, केशव बोंबले, सौ.सुषमा अरविंद चव्हाण, श्याम सुंदर ढगे, गजानन कदम, रमेश ढगे रामदास बोबडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम या मेळाव्याच्या जनजागृतीसाठी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गावातून वाजत गाजत प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता हरी पाटील चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करूनही मेळाव्याला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर या मेळाव्याची रूपरेषा तथा प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आय. एच .झंपलकर यांनी केले तर शाळेतील सहशिक्षिका सौ.निता दमकोंडवार (दरबस्तेवार)यांनी शाळा पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांचे विकास पत्र व सर्व कौशल्यांची माहिती पालक व प्रवेश पात्र विद्यार्थी यांना करून दिली.

तसेच याप्रसंगी या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत च्या सर्व वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. सदरील मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आय.एच.झंपलकर, सौ.निता दमकोंडवार (दरबस्तेवार),सौ. वंदना जिल्हेवार,सौ. कौसर शेख आदि सहशिक्षिकां सह अंगणवाडी शिक्षिका सौ. अर्चना चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.कौसर शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.निता दमकोंडवार (दरबस्तेवार) यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या